राज्यात सहा लाख क्‍विंटल कापसाची खरेदी 
राज्यात सहा लाख क्‍विंटल कापसाची खरेदी  
मुख्य बातम्या

राज्यात सहा लाख क्‍विंटल कापसाची खरेदी 

टीम अॅग्रोवन

अमरावती ः शेतकऱ्यांच्या वाढत्या रेट्यामुळे अखेर राज्यातील खरेदी केंद्रांची संख्या वाढवित ती ६२ पर्यंत नेण्यात आली आहे. एकट्या राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने ६ लाख ६२ हजार २४७ क्‍विंटल कापसाची खरेदी केली आहे. 

राज्यात शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसामुळे रणकंदन होत आहे. तब्बल ९५ ते १०० लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचा दावा कापूस प्रश्‍नाचे अभ्यासक करीत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे खरेदीची गती मंद असल्याने हा कापूस केव्हा खरेदी होईल, अशी विवंचना देखील आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी होत होती. 

राज्य सहकारी कापूस पणन महासंघाकडील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे केंद्रांची संख्या वाढविणे शक्‍य होत नव्हते. त्यानंतर आता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना कापूस ग्रेडींग व इतर प्रक्रियेसंबंधी माहिती देत त्यांच्या माध्यमातून खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे प्रस्तावित आहे. कापूस पणन महासंघाने राज्यात ६२ केंद्राच्या माध्यमातून ९८ जिनींगस्थळी खरेदी चालविली आहे. याव्दारे ६ लाख ६२ हजार २४७ क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून ३० एप्रिल पर्यंतच्या कापसाचे चुकारेही करण्यात आले आहेत. 

सध्या ६२ केंद्राच्या माध्यमातून ९८ जिनींगवर खरेदी होत आहे. लवकरच केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात ही केंद्र वाढतील.  - अनंतराव देशमुख,  अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT