प्रातिनिधीक छायाचित्र 
मुख्य बातम्या

नंदूरबार जिल्ह्यात कापसाच्या खेडा खरेदीला सुरूवात

शहादा, जि. नंदुरबार : पूर्वहंगामी लागवड केलेला बागायती कापसाचे उत्पादन निघायला सुरुवात झाली आहे. शेल्टी (ता. शहादा ) येथे नंदुरबार जिल्ह्यातील या हंगामाच्या कापूस विक्रीस प्रारंभ झाला.

टीम अॅग्रोवन

शहादा, जि. नंदुरबार  : पूर्वहंगामी लागवड केलेला बागायती कापसाचे उत्पादन निघायला सुरुवात झाली आहे. शेल्टी (ता. शहादा ) येथे नंदुरबार जिल्ह्यातील या हंगामाच्या कापूस विक्रीस प्रारंभ झाला. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर खाजगी व्यापाऱ्याने ४ हजार ५०० रुपये क्विंटल या दराने कापूस खरेदी केला.

शेल्टी (ता. शहादा) येथील महेश पूना साळवे या शेतकऱ्याने नव्या हंगामातील लांब धाग्याच्या कापूस एक क्विंटल वीस किलो प्रती क्विंटल ४ हजार ५०० रुपये दराने शेतातून व्यापाऱ्यास विकून जिल्ह्यात कापूस विक्रीच्या प्रारंभ केला. गेल्या महिन्याभराच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांचा कापूस शेतात ओला झाला. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्यात केली आहे. सुरुवातीला लगडलेली बोंडे परिपक्व झाल्याने त्यातून कापूस उत्पादित व्हायला सुरुवात झाली आहे.

दोन दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे पक्व झालेली कापसाची बोंडे उलगडायला लागली आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस यायला लागला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सध्या बेताची आहे. काहींनी घरात माल साठवण्यापेक्षा खाजगी व्यापाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी कापूस कोरोना समस्येमुळे अनेक दिवस घरात पडून होता. परंतु, शासनाने शेवटपर्यंत कापसाची खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे थोडे बहुत आर्थिक नुकसान टळले.

आता सध्या तरी नवीन हंगामात सुरुवातीला साडेचार रुपये क्विंटल दर मिळाला. तो सहा हजारच्या पुढे जावा अशी शेतकऱ्यांना आशा आहे. तेव्हाच कापसाच्या उत्पादन खर्च भरून निघेल. केंद्र शासनाने कापसाच्या हमी भावात वाढ केली आहे. लांब धाग्याचा कापूस ५ हजार ८२५ रुपये, तर मध्यम ५ हजार ५१५ हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

परिसरात सर्वाधिक शेतकऱ्यांकडे मध्यम धाग्याचा कापूस उत्पादित होतो. यंदा कापसावर आलेल्या विविध किडी, रोगांचा प्रादुर्भाव पाहता उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामानाने भावात अजूनही वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शासन खरेदी सुरुवातीपासूनच सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दरही चांगला भेटेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT