Purchase of 2 lakh 90 thousand quintals of cotton in Parbhani
Purchase of 2 lakh 90 thousand quintals of cotton in Parbhani 
मुख्य बातम्या

परभणीत दोन लाख ९० हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन

परभणी ः आधारभूत किंमत खरेदी दराने परभणी जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) पाच केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या एका केंद्रावर गुरुवार (ता. ५) पर्यंत ११ हजार ७३८ शेतकऱ्यांच्या २ लाख ९० हजार ४५८ क्विंटल कापसाची करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सूत्रांनी दिली.

भारतीय कापूस महामंडळातर्फे गुरुवार (ता. १९) ते बुधवार (ता. २) या कालावधीत जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर, पू्र्णा, ताडकळस या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांर्तगत हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे.

गुरुवारी (ता. ३) पणन महासंघातर्फे पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत बाभळगाव (ता. पाथरी) येथे कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. यंदा मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५५१५ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५८२५ रुपये एवढी आधारभूत किंमत आहे.

पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत नोंदणी सुरू झाली आहे. सीसीआयअंतर्गत ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीत १९५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांनी एसएमएस आल्यानंतर बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापूस विक्रीसाठी आणताना सोबत सात बारा उतारा, आधार कार्ड, बॅंक खाते पुस्तक यांच्या सत्यप्रती घेऊन याव्यात. चुकारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जातील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून यावे, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

बोरी येथे खरेदी केंद्र सुरू करावे जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये सीसीआयतर्फे आणि पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. परंतु बोरी (ता. जिंतूर) कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तूर्त शासकीय खरेदी केंद्रांचे नियोजन दिसत नाही.त्यामुळे बोरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जिंतूर येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. त्यासाठी वाहन भाड्यासह अन्य खर्चाचा भुर्दंड बसत आहे. बोरी येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT