Of Pune Market Committee Charan to the warriors: Garad
Of Pune Market Committee Charan to the warriors: Garad 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरड

टीम अॅग्रोवन

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, भाजीपाला विभागात शेतीमाल खरेदीदारांकडून बेकायदा वाहन पार्किंग शुल्क आकारणाऱ्या वारणारांच्या टोळीला प्रशासक मधुकांत गरड यांनी चाप लावला आहे. गेली १५ वर्षे सुरू असलेली बेकायदा वसुली बंद करण्यात आली आहे. आता टेम्पोचालकांना वार्षिक सशुल्क पास देण्यात येतील. याद्वारे बाजार समितीला सुमारे सव्वा कोटीचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. 

गरड म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमाल टेेम्पोमध्ये लावणारांची ४० जणांची अधिकृत टोळी शेतीमाल खरेदीदारांकडून बेकायदेशीररीत्या पार्किंग शुल्काचे १०० ते ३०० रुपये प्रतिवाहन प्रतिदिन घेत होते. ही लूट वार्षिक लाखो रुपयांची होती. यामध्ये काही कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. जागा बाजार समितीची आणि पार्किंग शुल्क कसले? या बाबत अनेक तक्रारी आल्यानंतर यावर चौकशी आणि कारवाईचे आदेश देण्यात आले. तक्रारींनंतर वारणार आणि लावणारांची टोळी काम न करता बेकायदा पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर संबंधित तोलणारांचे माथाडी कायद्याबाबत प्रबोधन करण्यात आले. जर कोणी काम न करता पैसे आकारले, तर त्यावर गुन्हे दाखल करण्याची तंबी देण्यात आली.’’

‘‘टेम्पोचालकांचे प्रबोधन करून, त्यांना कोणतेही पार्किंग शुल्क देऊ नये, असे सांगण्यात आले. तर शेतीमाल टेंपोमध्ये लावण्याचे काम केले तरच लावणारांना नियमाप्रमाणे पैसे देऊन, त्याची अधिकृत पावती नाव आणि मोबाईल क्रमांकासह घ्यावी, अशा सूचना दिल्या. गेल्या १५ दिवसांत या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू आहे’’, असे गरड यांनी सांगितले. 

पार्किंगमधून वार्षिक सव्वा कोटींचे उत्पन्न 

‘‘बाजार आवारात शेतीमाल खरेदीदारांची लहान मोठी सुमारे ५ हजार वाहने येतात. त्यांच्याकडून वार्षिक दीड आणि तीन हजार रुपये अधिकृत शुल्क आकारणी करून, त्यांना पास देण्यात येणार आहेत. या पासमुळे आता टेम्पोचालकांना कोणतेही पार्किंग शुल्क कोणालाही द्यावे लागणार नाही. याद्वारे बाजार समितीला सव्वा कोटींचे उत्पन्न मिळेल,’’ असे गरड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT