pune district in farmer vegetable crop sowing
pune district in farmer vegetable crop sowing  
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

टीम अॅग्रोवन

पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक असलेल्या हवामानामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या पिकांवर भर दिला आहे. यामुळे रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात भाजीपाल्याची सुमारे ५१ हजार ६९३ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे.  

दरवर्षी रब्बी हंगामात सरासरी ५० ते ६० हजार हेक्टरच्या जवळपास भाजीपाला पिकांची शेतकरी लागवड करतात. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, बारामती, दौंड, भोर, मावळ, हवेली या तालुक्यात कोथिंबीर, शेपू, मेथू, भेंडी, गवार, टोमॅटो या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्या तुलनेत पुरंदर, इंदापूर, शिरूर, वेल्हा, मुळशी या तालुक्यात भाजीपाल्याची कमी लागवड शेतकरी करतात. यंदा रब्बी हंगामात डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत पुणे जिल्ह्याच्या पूर्व व उत्तरेकडील तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील पावसाळ्यात चांगल्या झालेल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई नसली तरी अनेक शेतकरी कमी पाण्यामध्ये भाजीपाला घेऊ लागली आहेत. यामध्ये बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर, इंदापूर या तालुक्यात भाजीपाला पिकांची अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. सध्या उत्तरेकडील तालुक्यातील आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक १६ हजार ७३५ हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटोची सर्वाधिक लागवड केली आहे. त्यापाठोपाठ दुष्काळी ओळख असलेल्या पुरंदर तालुक्यातही दहा हजार ६४३ हेक्टरवर लागवड झाली आहे. 

खेडमध्ये सहा हजार २७ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होत असून, बाजारात भाजीपाल्याचे दर कमी प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. मात्र, किरकोळ विक्रेते अधिक दराने ग्राहकांना विक्री करत असल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय भाजीपाला पिकांचे क्षेत्र, हेक्टरमध्ये हवेली ५८९०, मुळशी २५७, भोर ५२७, मावळ २७, वेल्हे १४९, जुन्नर १७४०, खेड ६०२७, आंबेगाव १६,७३५, शिरूर २५४०, बारामती २४४२, इंदापूर २५१४, दौड २२०२, पुरंदर १०,६४३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT