In protest of the central government's package Kisan Sabha agitation in Nanded
In protest of the central government's package Kisan Sabha agitation in Nanded 
मुख्य बातम्या

केंद्र सरकारच्या पॅकेजच्या निषेधार्थ किसान सभेतर्फे नांदेडमध्ये आंदोलन

टीम अॅग्रोवन

नांदेड : शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी तत्काळ पीककर्ज द्यावे. बि-बियाणे, खते आदी निविष्ठांचा मोफत पुरवठा करावा, आदीसह शेतकरी-शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आणि केंद्र सरकारच्या तुटपुंज्या पॅकेजच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्ह्यातील किनवट, माहूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी (ता.२७) प्रतिकार दिन पाळत केंद्र शासनाच्या धोरणांविरुध्द निदर्शने करण्यात आली. 

येत्या खरीप हंगामासाठी सर्व शेतकऱ्यांना बँकांकडून नवीन पीककर्जाची हमी द्यावी. मोफत बी-बियाणे, खतांचा पुरवठा करावा. रब्बी हंगामात नुकसान झालेल्या पिकांची पूर्ण नुकसानभरपाई द्यावी. शेतकरी, शेतमजूर, प्रवासी, असंघटित कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला केंद्र सरकारकडून लॉकडाउन काळात दरमहा १० हजार रुपये थेट रोख मदत द्यावी. मजुरीच्या दरात वाढ करावी. सर्व शेतमाल, भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मध, फुले यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव द्यावा. डिझेलचे दर २२ रुपये लिटरपर्यंत कमी करावे. 

वनजमिनी, देवस्थान, इनाम जमीन, गायरान जमीन सर्व कसणाऱ्यांच्या नावे त्वरित कराव्या. कोरोनाचा विदारक अनुभव लक्षात ठेवून ग्रामीण, शहरी भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करावा, आदी मागण्यांसाठी किनवट, इस्लापूर, नंदगाव, पांगरी, नागापूर, कंचली, तोटंबा, दिपला नाईक तांडा, कोसमेट, चंद्रु तांडा, माहुर तालुक्यात हरडप, साकुर, गोकुळ, मलागुडा इत्यादी गावात प्रतिकार दिन पाळण्यात आला. 

केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सभेचे कार्याअध्यक्ष कॉ. अर्जुन आडे, कॉ. शंकर सिडाम, कॉ. किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, खंडेराव कानडे, तानाजी राठोड, विजय जाधव, मनोज सल्लावार, नागार्जुन कोमलावाड, इम्रान, धनराज आडे, बाबु गाडेकर, संजय मानकर आदीसह शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT