रब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित
रब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित 
मुख्य बातम्या

रब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात जमा असलेल्या मराठवाड्यात यंदा जवळपास १९ लाख हेक्‍टरवर रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. अर्थात पाऊस येण्यावरच सारे गणित अवलंबून आहे. मात्र, कृषी विभागाने केलेल्या नियोजनात यंदाच्या प्रस्तावित रब्बी क्षेत्रातून ज्वारीचे १०.३६ ते १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीत सविस्तर माहिती  देण्यात आली. कृषीच्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीत प्रामुख्याने ज्वारी, गहू, मका व हरभरा आदी पिके घेतली जातात. शिवाय लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांंत ज्वारी, गहू, मका, हरभरा, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात.

साडेतीन लाख क्‍विंटल बियाण्यांची मागणी मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर कृषी विभागाकडून यंदाच्या रब्बी हंगामासाठी ३ लाख ५० हजार क्‍विंटल विविध प्रकारच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांसाठी २ लाख ४४ हजार क्‍विंटल तर औरंगाबाद विभागांतर्गत तीन जिल्ह्यांसाठी १ लाख ६ हजार क्‍विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

पीकनिहाय प्रस्तावित उत्पादकता (हेक्‍टरी) क्‍विंटलमध्ये
पीक लातूर विभाग औरंगाबाद विभाग
ज्वारी १२ १०.३६
गहू १६.०८ १६.०८
मका १४.८१ ३७.०८
हरभरा ११.८५ १२.३९
करडई ८.५० ०००
जवस ३.१० ०००
सूर्यफूल ७.५५ ०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT