कांदा अनुदानासाठी १७ कोटींचा प्रस्ताव
कांदा अनुदानासाठी १७ कोटींचा प्रस्ताव 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी १७ कोटींचा प्रस्ताव

टीम अॅग्रोवन

पुणे : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी पुणे जिल्ह्याला १७ कोटी ३१ लाख ६० हजार ५४० रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांमध्ये ६२ हजार २०५ शेतकऱ्यांनी ८ लाख ६५ हजार ८०२ क्विंटल कांद्याची विक्री केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.

२०१६ मध्ये निर्माण झालेल्या अशा परिस्थितीमध्ये ४ कोटी ७२ लाख ५२ हजार ८४० कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आल्याचेही कटके यांनी या वेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील मंचर, बारामती, खेड, जुन्नर, पुणे, इंदापुर, शिरूर या ७ बाजार समित्यांमध्ये ६२ हजार २०५ शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान सुमारे ८ लाख ६५ हजार ८०२ क्विंटल कांद्याची विक्री केली. यानुसार प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे १७ कोटी ३१ लाख ६० हजार ५४० रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पणन संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केली. त्या बाजार समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज १५ जानेवारीपर्यंत सादर करावयाचा आहे. त्या अर्जांची छानणी झाल्यानंतर अनुदान थेट बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे, असे कटके यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान २०१६ मध्ये जुलै ते आॅगस्टदरम्यान विक्री झालेल्या कांद्याला याच धर्तीवर अनुदान देण्यात आले होते. या वेळी ७ हजार ९२८ शेतकऱ्यांना ४ कोटी ७२ लाख ५२ हजार ८४० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे कटके यांनी नमूद केले. हे अनुदान प्रति क्विंटल १०० रुपये एवढे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT