कंधार तालुक्यात कपाशीच्या उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न; अडीच हजार हेक्टरवर लागवड 
मुख्य बातम्या

कंधार तालुक्यात कपाशीच्या उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न; अडीच हजार हेक्टरवर लागवड

कपाशीच्या उत्पादकतावाढीसाठी यंदा कंधार तालुक्यातील अडीच हजार हेक्टरवर कपाशीची लागवड ठिबक सिंचन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात

टीम अॅग्रोवन

नांदेड : कपाशीच्या उत्पादकतावाढीसाठी यंदा कंधार तालुक्यातील अडीच हजार हेक्टरवर कपाशीची लागवड ठिबक सिंचन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असून, त्यास शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली. डोंगराळ, माळरानावरील कोरडवाहूबहुल क्षेत्र असलेल्या कंधार तालुक्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. उन्हाळी भुईमुगानंतर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशी आणि हळदीची लागवड सुरू केली आहे. तालुक्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २६ ते २८ हजार हेक्टर आहे. उत्पादनवाढीसाठी तसेच पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी यंदा कृषी विभागाने यंदा अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीची लागवड ठिबक सिंचनावर होण्याच्या यादृष्टीने नियोजन केले आहे. उत्पादनाची जोखीम कमी करण्यासाठी विविध आंतरपीक पद्धतींबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. सोयाबीनची उगवण क्षमता तपासून तसेच जिवाणू संवर्धके, बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन केले जात आहे. शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कीड, रोग, खत, पाणी व्यवस्थापन, काढणीपश्चात साठवणूक तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे. कीड, रोग सर्वेक्षण प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी केली जाणार आहे. गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी जनजागृती केली जाणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season: खानदेशात रब्बी हंगामावर मदार

Animal Feed in El Nino: पावसाच्या खंडात जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण का महत्त्वाचे?

Farmers Demand: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या : प्रशांत डिक्कर

Agrowon Podcast: सोयाबीन बाजारात घसरण, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, भेंडीच्या भावात बदल, काकडीच्या दरात चढ-उतार तर केळी बाजारात नरमाई

India Africa Seed Summit: इंडिया-आफ्रिका सीड समिटमध्ये ‘महाबीज’चे सादरीकरण

SCROLL FOR NEXT