milk collection  
मुख्य बातम्या

`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया 

लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) राज्यातील सहा दूध संघातील सुमारे ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून पावडर व लोणी उत्पादन करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) राज्यातील सहा दूध संघातील सुमारे ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून पावडर व लोणी उत्पादन करण्यात आले आहे. अतिरिक्त ठरलेले दूध शासनाने खरेदी करून ते ‘गोकुळ'कडे पाठवले होते.  दरम्यान, दूध पावडर, लोणीचे उत्पादन वाढले असले तरी बाजारातील मागणीही ठप्प आहे आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारातील दरही कमी असल्याने पावडर आणि लोणीही ‘गोकुळ’च्या गोदामातच पडून आहे.  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन पुकारण्यात आला. त्याचा सर्वाधिक फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला. ३१ मेपर्यंत हे दूध खरेदी केले जाणार आहे. खरेदी केल्या जाणाऱ्या दुधापासून पावडर, लोणी उत्पादन करण्याचे निश्‍चित झाले. पण खरेदी केलेल्या दुधाच्या तुलनेत त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कमी असल्याने शासनाने याची जबाबदारी ‘गोकुळ' वर सोपवली होती.  ‘गोकुळ’ कडे दैनंदिन पाच लाख लिटरवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. संघाचे सद्याचे संकलन कायम आहे पण विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे संघाचेचे दिड ते दोन लाख लिटर दूध अतिरिक्त आहे. त्याचबरोबर बारामती दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ, शिवामृत-अकलूज, फत्तेसिंग नाईक संघ-शिराळा या संघाकडील दूध ‘गोकुळ’ कडे प्रक्रियेसाठी पाठवले जात होते.  आतापर्यंत या संघाकडून सुमारे ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यात आली आहे. या दुधापासून ‘गोकुळ' ने ३८० टन पावडर तर १९० टन लोणी उत्पादित केले आहे. गुजरातच्या आनंद डेअरीत दर आठवड्याला एनसीडीएफ मार्फत लोणी व पावडरचा लिलाव होतो, पण गेल्या दोन आठवड्यात एक रूपयाचाही विक्री या लिलावातून झालेली नाही. त्यामुळे पावडर आणि लोणीही पडून आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन

Seed Scam: शेतकऱ्यांचे आयुक्तालयाच्या छतावर आंदोलन; धाराशिव निविष्ठा घोटाळा प्रकरण

Heavy Rainfall Relief: मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे १६ हजार कोटी खात्यात जमा; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT