The process of giving land to landless agricultural laborers has started: Londhe 
मुख्य बातम्या

भूमिहीन शेतमजुरांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू : लोंढे

कोल्हापूर : ‘‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिरायत खासगी जमीन खरेदी करून १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे’’, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : ‘‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिरायत खासगी जमीन खरेदी करून १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे’’, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

अनुसूचित जातीच्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे अन्य साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजना किंवा खासगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागते. त्यांचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, या करिता त्यांच्या मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना कसण्यासाठी २ एकर बागायती किंवा ४ एकर जिरायत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्रा जवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये. जमीन सलग असावी, जे जमीन मालक शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार (रेडीरेकननुसार) किंवा जिरायत जमीन कमाल ५ लाख रुपये प्रतिएकर व बागायत जमीन कमाल ८ लाख रुपये प्रतिएकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, अशा जमीन मालकांनी जमिनीच्या ७/१२ व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT