छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा 
मुख्य बातम्या

छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा

टीम अॅग्रोवन

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेकविध यंत्रसामुग्री बाजारामध्ये उपलब्ध असून देखील राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना ही यंत्रसामग्री विकत घेणे परवडत नाही, शेतमजुरांचा तुटवडा, पिकांची वेळेवर काढणी अशा अनेक समस्या आज राज्यातील शेतकऱ्यांसमोर आहेत. त्याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष देणे गरजेचे बनलेले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले. 

भारतीय ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स सोसायटी (एस. ए. ई.) व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिफन-२०१९’ या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

या वेळी डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, सोसायटीचे नीलेश पाठक, अभिजित वराडे, संजय निबंधे, आयोजक संदीप महाजन, विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते.

कुलगुरू पुढे म्हणाले, ‘‘आज कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी छोट्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मागणीनुसार कृषियंत्रे विकसित करणे गरजेचे आहे. ता. १८ ते २० मार्च या कालावधीमध्ये देशभरातील ५७५ विद्यार्थी व ५२ मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत. कांदा पीक काढणी या थिमवर या विद्यार्थ्यांच्या २५ संघांनी कांदा काढणीसाठी विविध कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केलेले आहे. ३० पंचांच्या साह्याने या यंत्रांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. याद्वारे लहान शेतकऱ्यांना शेती करणे सोईचे होईल.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा व विशाल यांनी केले. डॉ. सचिन नलावडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT