dada bhuse  
मुख्य बातम्या

मातीचे आरोग्य जपणे गरजेचे ः भुसे

येणाऱ्या काळात शेतीचे भविष्य मातीवर अवलंबून असणार आहे. त्यासाठी सर्वांनी मातीचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी व खताचा अतिवापर टाळून मातीचे आरोग्य जपावे लागणार आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : येणाऱ्या काळात शेतीचे भविष्य मातीवर अवलंबून असणार आहे. त्यासाठी सर्वांनी मातीचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी व खताचा अतिवापर टाळून मातीचे आरोग्य जपावे लागणार आहे. अन्यथा, भविष्यात परिणाम भोगावे लागतील. म्हणून शाश्‍वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.  जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. ५) मालेगाव तालुक्यातील खडकी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, ‘आत्मा’ प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पुढे बोलताना मंत्री भुसे म्हणाले, की पारंपरिक शेतीपासून आपण दूर जात आहोत. त्यामुळे माती परीक्षण करूनच खतांची मात्रा दिली जावी. अन्नाचा मुख्य स्रोत असलेली मातीच खराब होत असल्याने मातीचे आरोग्य पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे कृषी विभागाच्या योजना शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येतील असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  या वेळी आदर्श ग्रामविकास योजनेअंतर्गत त्यांनी खडकी गावाची निवड जाहीर केली. तालुक्यातील तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या माळ माथा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापनेची घोषणा या वेळी कृषिमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

सुपीकता निर्देशांक फलकाचे वितरण  शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी गावातील जमिनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपीकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत, अशी सूचना कृषिमंत्री भुसे यांनी केली होती. त्यानुसार फलकांचे अनावरण करून तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT