Possibility of state temperature fluctuations 
मुख्य बातम्या

राज्याच्या तापमानात चढ-उताराची शक्यता

राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. पहाटे गारठा जाणवत असला तरी कडाक्याच्या थंडीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. पहाटे गारठा जाणवत असला तरी कडाक्याच्या थंडीसाठी वाट पाहावी लागणार आहे. आज (ता. ११) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तसेच तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढत आहे. राजस्थानाच्या चुरू येथे शुक्रवारी (ता. १०) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ हवामान होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही वाढला आहे.  

राज्याच्या कमाल तापमानाचा पारा वाढला असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे आहे. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. महाबळेश्‍वर येथे नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे २८.८ (१५.१), नगर - (१८.३), जळगाव २९.६ (१६), कोल्हापूर २९.५ (१९.३), महाबळेश्‍वर २३.३ (१४.८), मालेगाव २६.६ (१७.४), नाशिक २८.६ (१५.१), निफाड २८.५ (१५), सांगली २९.७ (१८.३), सातारा २९.१(१६.९), सोलापूर ३१.५ (१८.६), सांताक्रूझ ३३.२ (२२.२), अलिबाग ३१.४ (-), डहाणू २९.१ (१९.६), रत्नागिरी ३४.८ (२१.६), औरंगाबाद २८.७ (१७), नांदेड ३१.२ (१८), परभणी ३१ (१५.८), अकोला ३१.८ (१८.५), अमरावती ३१ (१५.३), बुलडाणा ३० (१७.७), चंद्रपूर ३०.८ (१८.४), गडचिरोली ३१ (१७.२), गोंदिया २९.५ (१५.४), नागपूर ३०.६ (१६.४), वर्धा ३०.२ (१६.८), वाशीम ३२ (१६), यवतमाळ ३० (१५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT