Police seize bogus seeds worth Rs 6.5 lakh at Devgaon Fata 
मुख्य बातम्या

पोलिसांची कारवाई; देवगाव फाटा येथे साडेसहा लाखांचे बोगस बियाणे जप्त

जप्त केलेल्या बियाण्यांवर कोणत्याच प्रकारची माहिती नोंदविलेली नाही. त्यामुळे हे बियाणे बोगस आहे; पाकिटातील बियाण्यांचे नमुने घेत ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्या अहवाला आधारे पुढील कारवाई केली जाईल. - अजय तळेगावकर,तालुका कृषी अधिकारी, धामणगावरेल्वे

टीम अॅग्रोवन

अमरावती : अमरावती विभागात कृषी विभागाची यंत्रणा कुचकामी ठरली असतानाच पोलिसांनीच कारवाई करीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा बोगस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. एचटीबिटी बियाण्यांच्या आड या बियाण्यांची विक्री होण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे एचटीबिटीच्या नावाखाली फसवणूक होण्याबाबतचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने सोमवार (ता.८) च्या अंकात प्रकाशित केले होते. 

जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या पथकाकडून देवगाव फाटा येथे नाकाबंदी केली जात होती. यावेळी पथकाने टाटा-एस हे वाहन थांबवित त्याची झडती घेतली. त्यावेळी त्यात बियाण्यांचा मोठा साठा मिळून आला. हे बोगस किंवा एचटीबिटी असल्याच्या शक्‍यतेने पोलिसांकडून वाहनासह बियाणे जप्त करण्यात आले.

तळेगाव दशासर पोलिसांकडे हे प्रकरण पुढील चौकशीकामी देण्यात आले. याप्रकरणी रामबिर रामचरणसिंग (बोरगाव धांदे ता. धामणगाव) तसेच टाटा-एस गाडीचा चालक अंभोरे अशा दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी दिली. 

जप्त केलेल्या बियाण्याची किंमत ६ लाख ५५ हजार ५४० रुपये इतकी आहे. कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून हा साठा अमरावती जिल्हयात पोचल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

कृषी विभाग अनभिज्ञ 

नागपूर विभागात आजवर सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा अधिक एचटीबिटीचा साठा जप्त करण्यात आला. अमरावती विभागातील सर्वच जिल्ह्यांत एचटीबिटीचा पुरवठा झाला असताना कृषी विभागाकडून कारवाईच केली जात नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणूकीला कृषी विभागाच जबाबदार असल्याचा आरोप आहे.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT