PM should show sentimentality towards farmers: Ajit Pawar 
मुख्य बातम्या

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांप्रति भावुकता दाखवावी ः अजित पवार

गुलाम नबी आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदी भावुक झाले होते, अशी पंतप्रधानांची भावुकता शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत दिसावी हीच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

नाशिक : दिल्लीत सुमारे ७७ दिवसांपासून शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. थंडी, वाऱ्यात सुरू असलेल्या आंदोलनात अनेकांचे जीव गेले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली पाहिजे. बैठका होऊनही त्यात तोडगा निघत नाही. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या गुलाम नबी आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदी भावुक झाले होते, अशी पंतप्रधानांची भावुकता शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत दिसावी हीच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

श्री. पवार हे बुधवारी (ता. १०) जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीसाठी नाशिकला आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यसभेचे सदस्य श्री. आझाद यांच्या निरोपपर भाषणात पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली. श्री. पवार म्हणाले, की पंतप्रधान भावुक झाले होते. मात्र त्यांची ही भावुकता दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनीप्रति केव्हा दिसेल, असा प्रश्न श्री. पवार यांनी केला. शेतकऱ्यांना २ टक्के व्याजाने तीन लाखांपर्यंत कर्ज देण्यात पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्हा बँकांनी पुढाकार घेतला. मात्र ज्या जिल्हा बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होतो आहे. पण ज्या बँका अडचणीत आहेत, नीट चालत नाहीत तेथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्याचे स्पष्ट केले.

श्री. पवार म्हणाले, केंद्रीय अर्थसंकपात नाशिक, नागपूरच्या मेट्रोसाठी केंद्र सरकारने तरतूद केली आहे. त्यानुसार राज्य शासन स्वतःचा निधीची आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रकल्पात राज्याच्या वाट्याचे जे-जे विषय आहेत त्यात राज्य शासन कमी पडणार नाही. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात नाशिक व नागपूरच्या मेट्रोसाठी आर्थिक तरतूद दिसेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Fodder Crops: रब्बीमध्ये मका, ओट, बरसीम की लसूणघास? यंदा कोणते चारा पीक घ्यावे?

Baramati Innovation Valley: बारामतीत उभारणार‘इनोव्हेशन व्हॅली’ : पवार

Additional Chief Secretary on Leave: महाराष्ट्राच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव रजेवर

Maharashtra Drought: दुष्काळी तालुक्यांची ‘ग्राउंड ट्रुथिंग’; प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

Spice Sale Ban: सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

SCROLL FOR NEXT