मुख्य बातम्या

अकोल्यात चौदा कोटींचा कीटकनाशकांचा साठा जप्त

Gopal Hage

अकोला ः जिल्हा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी यंत्रणा अाणि पुणे येथून अालेल्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत अकोला येथील विविध कंपन्यांचा सुमारे १४ कोटी ३१ लाख रुपयांचा साठा जप्त करुन विक्रीबंदचे आदेश दिले. अातापर्यंतच्या कारवाईत विविध कीडनाशक उत्पादक कंपन्यांचा मिळून २८४.३१ मेट्रिक टन साठा असल्याची माहिती पुढे अाली अाहे.  कीडनाशकांची एक मोठी बाजारपेठ असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीडनाशकांचा गोरखधंदा होत असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने दिले होते. यामुळे राज्य स्तरावरील यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग अाणि पुणे येथून अालेल्या तज्ज्ञांच्या चमूने गेले तीन दिवस अकोल्यातील विविध कीडनाशक विक्रेत्यांचे सर्व गोदाम छाणून काढले. या चौकशीदरम्यान प्रंचड प्रमाणात घोळ समोर अाले अाहेत. कीटकनाशकांच्या तपासणीमध्ये अक्षम्य प्रकारच्या त्रुटी अाढळून अाल्याने थेट विक्रीवर बंदी घालण्यात अाली. यात प्रामुख्याने जीवितास हानीकारक, परवान्यात समाविष्ट नसलेल्या औषधांचा साठा, उगम प्रमाणपत्रात नाव नसणे, साठा रजिस्टर अद्ययावत नसणे, कर्मचारी प्रशिक्षित नसणे, बिगर नोंदणीकृत कीटकनाशकांची विक्री, खत नियंत्रण अादेशाचे उल्लंघन अशी कारणे समोर अाली अाहेत. तपासणी मोहीम सुरू असल्याने या अाकडेवारीमध्ये अाणखी वाढ होण्याची शक्यता अाहे.   

विक्रेता व गोदाम नाव पारिजात इंडस्ट्रीज लिमिटेड, कृषी रसायन एक्स्पोर्ट, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रा. लि. अाझादपूर दिल्ली, घरडा केमिकल्स लि. सांबा (जम्मू व काश्मीर),  मे. फायटोकेम इंडिया लि, मेडक अांध्र प्रदेश, मे. जयलक्ष्मी इंडस्ट्रीज गुजरात, सिंजेटा इंडिया लि, एफएमसी इंडिया प्रा. लि, शिवालीक क्रॉपसायन्सेस, सल्फर मिल्स लि, बायोस्टँड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT