लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द Permanent revocation of licenses of linking agricultural service centers 
मुख्य बातम्या

लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

अकोलाजिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला : जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. या शिवाय तीन कृषी सेवा केंद्राचे बियाणे विक्री व एकाचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला. या शिवाय काहींना सक्त ताकीदही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून सोयाबीन बियाणे व खत विक्रीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकरणे समोर आली होती. शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारींचा ओघ वाढला होता. काही ठिकाणी कृषी विभागाच्या पथकांनी पाहणी केली तेव्हा या तथ्य आढळून आले.  तेल्हारा येथील विक्रेत्याने तर सोयाबीन बियाणे हवे असेल तर कपाशी बियाणे घ्यावे लागेल, अशी सक्ती चालवली होती. या बाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तेथील कृषी विभाग जागा झाला. त्यानंतर चौकशी करून वरिष्ठांना अहवाल दिला.  या प्रकरणी सोमवारी (ता. १४) अकोल्यात सुनावणी घेण्यात आली. यापैकी काही विक्रेत्यांकडे तपासणी दरम्यान कागदपत्रांची पूर्तता नव्हती. अशा विविध कारणांनी कृषी सेवा केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.  तेल्हारा येथील दधिमती कृषी सेवा केंद्राचा बियाणे खरेदी-विक्रीचा परवाना सोमवारपासून कायमस्वरुपी रद्द  करण्यात आला आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत यांनी आदेश काढले. कृषी केंद्र आणि झालेली कारवाई १) गणेश कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- एक महिना निलंबित, २) अमोल कृषी सेवा केंद्र, आलेगाव- तीन महिने निलंबन, ३) गजानन कृषी सेवा केंद्रा, बार्शीटाकळी- १५ दिवस निलंबन, ४) दधिमती कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- परवाना रद्द, ५) पुष्कर ॲग्रो एजन्सी, तेल्हारा- ताकीद, ६) यश कृषी सेवा केंद्र, दानापूर-ताकीद, ७) सद्‌गुरू कृषी सेवा केंद्र, दानापूर- ताकीद, ८) महालक्ष्मी सीडस, तेल्हारा- ताकीद, ९) सरिता कृषी सेवा केंद्र, तेल्हारा-ताकीद.

यापूर्वी झालेली कारवाई

१) प्रकाश ट्रेडिंग कंपनी, अकोला- एक महिना खत परवाना निलंबित, २) तिरुपती कृषी सेवा केंद्र, अकोला- ताकीद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

Dharashiv ZP Development: सुविधा, नावीन्यपूर्ण योजनांना प्राधान्य

ASHA Workers Honorarium: गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांना नियमित मानधन देण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?

Wheat Harvesting Tips: गव्हाची काढणी, मळणी आणि साठवण करताना काय काळजी घ्याल?

Crop Insurance Delay: स्थगिती नसताना शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा का अडवला?

SCROLL FOR NEXT