Pay the amount of sugarcane as per ‘FRP’; Demand for Swabhimani 
मुख्य बातम्या

‘एफआरपी’नुसार उसाची रक्कम द्या; `स्वाभिमानी`ची मागणी

परभणी : ऊस देयकाची रक्कम एका महिन्याच्या आत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे करण्यात आली.

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयात ६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीतील निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार ऊस देयकाची रक्कम एका महिन्याच्या आत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे करण्यात आली.

शेतकरी प्रश्नी संघटनेने जिल्ह्यातील साखर कारखानदारांविरोधात  आंदोलनाची भूमिका घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे प्रतिनिधी, ऊस उत्पादक, कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्या वेळी  एफआरपीनुसार ऊस देयकाची रक्कम एका महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी. बळिराजा साखर कारखान्यासह सर्व साखर कारखाने ऊस लागवड नोंदीनुसार ऊस तोड करतील. शेअर्सची सक्ती करू नये. प्रत्येक कारखान्याच्या दर्शनी भागात एफआरपीचे फलक लावावे. 

वजन काटा, साखर उतारा, तपासणीसाठी गुणनियंत्रक समिती स्थापन करावी. २६५ या उसाच्या वाणास साखर आयुक्तांची  मान्यता आहे. त्यामुळे तोडणी करावी, आदी मागण्यांवर तोडगा निघाल्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले होते. परंतु, एक महिन्याचा कालावधी उलटला, तरी साखर कारखान्यांनी या निर्णयांची अंमलबजावणी केलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

Forest Fire: वनी वणवा पिसाटला

Maharashtra Politics: दानवेंच्या उमेदवारीवरून धुसफूस

SCROLL FOR NEXT