अवैध मासेमारी रोखण्यासाठी गस्ती नौका Patrol boats to prevent illegal fishing 
मुख्य बातम्या

अवैध मासेमारी रोखण्यासाठी गस्ती नौका

राज्यातील गोड्या पाण्याच्या तलावात मत्स्य निर्मिती करण्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांशी करार करण्यात येतो. अशा तलावात चोरटी मासेमारी होऊ नये, यासाठी गस्ती नौका तैनात करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

नागपूर  : राज्यातील गोड्या पाण्याच्या तलावात मत्स्य निर्मिती करण्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांशी करार करण्यात येतो. अशा तलावात चोरटी मासेमारी  होऊ नये, यासाठी गस्ती नौका तैनात करण्यात आली असून, राज्यात पहिल्या गस्ती नौकेचे उद्घाटन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी  केले. तेलंगखेडी (फुटाळा) तलाव हा पंचशील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला कराराने देण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र अशाच प्रकारच्या गस्ती नौका तलावात ठेवण्यात येणार आहे, तसेच  ढिवर (मच्छीमार) समाजाचे प्रश्नांचा पाठपूरावा करुन  त्यांना मदत करण्यात येईल, असे  केदार यांनी सांगितले.  केंदार यांनी या गस्ती नौकेतून तलावाची पाहणी केली. पंचशील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, सामाजिक कार्यकर्ते नरु जिचकार, जिल्हा मजदूर संघाचे अध्यक्ष स्वप्नील लिखार, दिपक चव्हाण, नगर सेवक कमलेश चौधरी, शैलेंद्र अवस्थी, मुकेश चौधरी, राजा गोवाळे यावेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT