Paddy cultivation in the mud in Ajara 
मुख्य बातम्या

आजऱ्यात चिखलातच भातकापणी

आजरा, जि. कोल्हापूर ः ढगाळ वातावरण तालुक्यात कायम आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भात व नागलीच्या वाफ्यामध्ये पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून भात कापणी करावी लागत आहे.

टीम अॅग्रोवन

आजरा, जि. कोल्हापूर ः ढगाळ वातावरण तालुक्यात कायम आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भात व नागलीच्या वाफ्यामध्ये पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून भात कापणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिश्रमात वाढ झाली आहे. यामुळे भात व नागलीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अंतिम टप्यातील सुगीची कामे रेंगाळलेली आहेत.

तालुक्यात भात कापणी व नागली शेंडलणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात सुगीची कामे सुरु आहेत. या भागात गरवी जातीच्या भाताचे पिकाची लागवड होत असते. आजरा घनसाळ व काळा जिरगा या भाताची कापणी सुरु झाली आहे. अवकाळी पावसामुळे ही कामे रेंगाळलेली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे दलदल तयार झाली आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस झाला नसल्याने आजपासून शेतकऱ्यांनी भाताची कापणी व नागलीची शेंडलणी सुरु केली आहे. 

चिखलात बसून भात कापावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना त्रासाला सामोरे जावे आहे. सध्या शेतीकामात मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यांत्रिक साधनाचा वापर करावा लागतो. पण अवकाळी पावसामुळे शेतात दलदल व चिखल आहे. 

नागलीची जमिनीवर लोळण 

पावसाच्या माऱ्याने भात व नागलीने जमिनीवर लोळण घेतली आहे. त्यामुळे त्याची कापणीही वेळेत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. त्याचबरोबर गवत वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जनावरांच्या वर्षभराच्या वैरणीचा प्रश्नही तयार झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT