पन्हाळ्यात आत्मातर्फे भात पीक प्रात्यक्षिक
पन्हाळ्यात आत्मातर्फे भात पीक प्रात्यक्षिक 
मुख्य बातम्या

पन्हाळ्यात आत्मातर्फे भात पीक प्रात्यक्षिक

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून ४० एकरवर भात पीक प्रात्यक्षिके राबविली जात आहेत. येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या बाजारभोगाव, किसरुळ, वारणूळ या गावांमध्ये फुले समृद्धी आणि कर्जत ७ या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित भात जातीची रोपवाटिका तयार करून त्याद्वारे लागवड केली जात आहे. सध्या मुख्य शेतात चिखलणी करून रोपलागण करण्याचे काम चालू आहे.

आत्माच्या माध्यमातून बियाणे, बीजप्रक्रियेचे जिवाणू कल्चर, युरिया डीएपी ब्रिकेट, पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मेटॅरायझीयम अॅनिसोपोली, खोड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेरोमोन ट्रॅप्स आणि ल्यूर्स आदी निविष्ठांचे प्रात्यक्षिके राबविणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असल्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी मंडल अधिकारी सदाशिव कारंडे, व्ही. आर. गायकवाड, विश्वजीत पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, गुंडा पाटील, बाबुराव डेगळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT