डाळींब बागा
डाळींब बागा  
मुख्य बातम्या

जत तालुक्यात तीन हजार एकरांवरील डाळिंब बागांचे झाले सरपण

Abhijeet Dake

सांगली ः  डाळिंबासाठी दीड लाखाचं कर्ज घेतलं...पाऊस न्हाय.. पाणी न्हाय...डाळिंबातून काहीच मिळालं नाही... बागा वाळून गेल्याती... पुढल्या वर्षी डाळिंब बागा राहणार न्हाय... कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न हाय... अशी हतबलता जत तालुक्यातील डाळिंब उत्पादकांनी व्यक्त केली. तालुक्यातील तीन हजार एकराहून अधिक क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून सरपण झाल्या. बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.   जत तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. जानेवारीपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व भागात पाणी नाही. पश्चिम भागात म्हैसाळचे पाणी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, पूर्व भागातील ४२ गावांतील शेतीला जवळपास पाणी कुठेच उपलब्ध होत नाही. डाळिंब बागांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणी मिळालेले नाही. अनुकूल हवामान, कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे डाळिंब पीक आहे. ठिबक सिंचन, शेततलाव, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. माडग्याळ, दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी (जत), दरीकोणूर, वाळेखिंडी, काशिलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात २६ पाटबंधारे व साठवण तलाव, २ मध्यम प्रकल्प आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तलावातून तसेच तलावाशेजारी ओढ्यालगत विहीर खोदून पाइपलाइन करून पाणी आणले. मात्र, यावर्षी तालुक्यात ४८.३ मि.मी. पाऊस झाला आहे. तसं पाहिलं तर या पावसाचा शेतीसाठी काहीच उपयोग झाला नाही. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालीच नाही.  तालुक्यातील १६ तलाव कोरडे पडले आहेत, तर संख, दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृत संचयाखाली गेली आहे. पश्चिम भागातील तलावांना म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. पूर्व भागातील अंकलगी तलाव वगळता सर्व तलाव चार महिन्यांपूर्वीच कोरडे पडलेले आहेत. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कर्ज थकले डाळिंबासाठी कर्ज घेतले आहे. परंतु, पाण्याअभावी डाळिंबाचे उत्पादन हातीच लागले नाही. त्यात डाळिंबाला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे घेतलेली कर्ज कशी फेडायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कर्ज भरली नसल्याने शेतकऱ्यांना नोटीसादेखील येऊ लागल्या आहे.  वीस टक्के क्षेत्रात घट होण्याची शक्यता जत तालुक्यात डाळिंब हे मुख्य पीक आहे. परंतु, दुष्काळाची दाहकता वाढल्याने उत्पादकांपुढे मोठे संकट आहे. बागा वाचविण्यासाठी आतापर्यंत टॅंकरने पाणी दिले. पण आता पाणी मिळत नाही. तलाव कोरडे पडले. याचा फटका डाळिंबाच्या क्षेत्रावर झाला असून, २० टक्के क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT