Outbreaks of bird flu are not found in dead birds 
मुख्य बातम्या

`मृत पक्ष्यांत नाही ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव`  

नाशिक : ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मृत झालेल्या पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मृत झालेल्या पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. गुरुवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबूराव नरवाडे यांनी दिली.

ग्राहक व कुक्कुटपालन उद्योगास मोठा दिलासा मिळाला. खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाने जिल्ह्यातील एकूण दोन नमुने पाठविले होते. ज्यामध्ये मालेगावमधील देशी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने काही अंशी भीतीचे वातावरण होते. येथील कुक्कुटपालकाने शास्त्रीय पद्धतीने संगोपन न केल्याच्या अभावामुळे पक्षी मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय विभागाला होता. तर, नाशिक महापालिका क्षेत्रात एक देशी कोंबडी मृत अवस्थेत सापडली होती. याबाबत सखोल निदान करण्यासाठी हे नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आले. आता ते निगेटिव्ह आल्याने प्रादुर्भाव नसल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, जिल्ह्यात ५४ स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३२ कावळे आणि २२ इतर पक्षी आहेत. 

पशुवैद्यकीय विभागाची खबरदारी

‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाच्या नाशिकमधील अशोक स्तंभ भागातील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. यासह २८ शीघ्र पथकांची स्थापना करण्यात आली. ही पथके जिल्ह्यातील १५ तालुक्यांत कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत असल्याची माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT