पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये आढळला प्रादूर्भाव The outbreak was found in three mango orchards in the rain
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये आढळला प्रादूर्भाव The outbreak was found in three mango orchards in the rain 
मुख्य बातम्या

पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये आढळला प्रादूर्भाव 

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील बागेत लाल कोळी आढळून आला आहे. या कीडरोगामुळे आंब्याची पाने आणि मोहोर गळून गेला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना औषध फवारणीचा खर्च करावा लागत आहे. 

गेले पंधरा दिवस सतत उन्हाचा कडाका आणि ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. सलग चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जानेवारीच्या सुरवातीला तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता; मात्र त्यावर नियंत्रण आले आहे. पण नव्याने काही बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा कोळी आंब्याच्या पानांमधील रस शोषून घेतो. पाने करपून जाता आणि ती गळून पडतात. ही कीड मोहोरालाही घातक बनलेली आहे. 

या बाबत पावस येथील बागायतदार आनंद देसाई म्हणाले, ‘‘आमच्या बागेमध्ये काही झाडांवर लाल कोळी दिसून आला. एका झाडापासून तो तीन मीटर अंतरावर उडू शकतो. त्यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडापासून जवळ असलेल्या २५ झाडांवर औषधांची फवारणी करावी लागते. पावसमधील तीन बागांमधील काही झाडांवर हा कीटक सापडला. औषध फवारणी केली आहे. एका फवारणीसाठी दोन हजार रुपयांचे औषध लागते. तापमानातील बदलांमुळेच हा रोग उद्भवला आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT