‘काजू बी’ला जीआय मानांकनासाठी संघटित व्हा : प्रा. गणेश हिंगमिरे  
मुख्य बातम्या

‘काजू बी’ला जीआय मानांकनासाठी संघटित व्हा : प्रा. गणेश हिंगमिरे

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : ‘‘काजूवरील व्हॅट कमी केल्याचा फायदा परदेशातील काजूला झाला आहे, मात्र येथील शेतकरी संकटात सापडला आहे. चांगला दर मिळविण्यासाठी आपला ब्रँड तयार होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी जीआय मानांकनासाठी संघटित व्हावे,’’ असे आवाहन प्रा. गणेश हिंगमिरे यांनी येथे केले.

सावंतवाडी मळगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ‘काजू बी’ जीआय मानांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सांवत, संचालक व्हिक्टर डॉन्टस, प्रमोद कामत, प्रमोद धुरी, गुरुनाथ पेडणेकर, गजानन गावडे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर बांदेकर, सुधाकर नेररकर, एकनाथ नाडकर्णी, मनीष दळवी उपस्थित होते.

 हिंगमिरे म्हणाले, ‘‘केरळमधील काजूला जीआय मानांकन असल्यामुळे तेथील काजूची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादनातून १२०० ते १३०० कोटींची उलाढाल होते. मात्र असे असले तरी येथील शेतकरी जीआय मानांकनाबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे भविष्यात येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होणे आवश्‍यक आहे. उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रितपणे येणाऱ्या संकटाचा सामना केला तरच तो सावरू शकेल.’’

काजूसाठी बँक योजना राबविणार

काजू उत्पादनातून येथील शेतकऱ्यांला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काजू बागायतदारास जिल्हा बँक प्रति झाड ६०० रुपये, तर जीआय मानांकन झाडास ७०० रुपये याप्रमाणे कर्ज देणार आहे. बँकेमार्फत ही स्वतंत्र योजना राबविली जाणार असल्याची माहिती बँकेंचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Farmer Schemes: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार कमी कागदपत्रे ! डीबीटी पोर्टलवरील २१ योजनांचे डिजिटल सुसूत्रीकरण

Marigold Price: दसऱ्यात झेंडूचा रंग पडला फिका; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा!

Maharashtra Rain Prediction: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत १५ जागा बिनविरोध, ६ जागांसाठी १३ जण रिंगणात, पडळकर विरुद्ध पवार लढत

Market Committee Rule: बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांच्या चढ-उतारावर बंदी; माथाडी कामगारांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT