संत्रा बाग
संत्रा बाग 
मुख्य बातम्या

दुष्काळी स्थितीमुळे मुंगळा येथील संत्रा उत्पादक संकटात

टीम अॅग्रोवन

अकोला ः मालेगाव तालुक्यातील मुंगळा हे गाव संत्रा उत्पादनात वर्षानुवर्षे अग्रेसर असल्याने ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून अोळखले जाते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती उद्‍भवल्याने या गावातील असंख्य उभ्या संत्रा बागा वाळल्या. शासनाने अाम्हाला मदत करावी, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी गुरुवारी (ता. ७) तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.

कमी पावसाचा फटका संत्रा बागांना बसला अाहे. पाण्याअभावी व उन्हामुळे बहुतांश शेतातील बागा वाळल्या अाहेत. या वाळलेल्या बागांचा शासनाने तातडीने सर्व्हे करावा व नुकसान भरपाई मिळावी, असा ठराव ग्रामपंचायतीनेही घेतला अाहे. शेतकऱ्यांचे निवेदन, ग्रामपंचायतीचा ठराव अशी सर्व कागदपत्रे गुरुवारी संत्रा उत्पादकांनी सरपंच संजय नखाले नेतृत्वात तहसीलदार राजेश वझिरे यांना दिली.

यावेळी मालेगाव पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानबा पाटील सावळे, सरपंच डिगांबर पवार, उपसरपंच गजानन केळे, प्रमोद केळे, राजू केळे, जनार्दन जायभाये, गंभीर नखाते, राजेश भांदुर्गे, विनोद कुटे, गणेश काकडे, सुनील नाईक, सागर नाईक, बबन नखाते, मुरलीधर पवार, नथ्थू नखाते, संदीप बोबडे, रमेश भांदुर्गे, यांच्यासह असंख्य संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित  होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT