Optional sale of agricultural commodities Make arrangements available 
मुख्य बातम्या

शेतीमाल विक्रीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा

नाशिक : शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील.

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी (ता. १२) दुपारी १२.०० वाजेपासून २३ मेच्या रात्री १२.०० वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहतील. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. या बाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थांवर निश्चित करण्यात आली.  

जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहतील. बाजार समिती कार्यक्षेत्रातील गावांचे गावनिहाय गट करून गटांसाठी एक मध्यवर्ती ठिकाण निश्चित करावे. त्या ठिकाणी बाजार समितीने शेतीमाल खरेदी, विक्रीची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शेतीमाल विक्रीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करून बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी यांच्या खळ्यांवर बाजार समितीचे परवानाधारक हमाल, मापारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदीची व्यवस्था करावी.

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या सर्व शेतीमालाची शेतकरीनिहाय दैनंदिन आवक, बाजारभाव, निर्गती यांच्या नोंदी ठेवण्यासाठी बाजार समितीने आवश्यक ते अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा सूचना बाजार समित्यांना दिलेल्या परिपत्रकाद्वारे केली आहे.

सहायक निबंधकांची नियुक्ती 

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या नियम व अटीचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. तसेच संबंधितांनी कोरोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक बाबींची खबरदारी घेणे अनिवार्य राहील. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बाजार समिती व खरेदीदार, व्यापारी यांची राहील. यासाठी नियोजन करण्यासाठी  बाजार समित्यांवर तालुका सहाय्यक निबंधकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांना बाजार समितीच्या दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT