जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर रास्ता रोको Opposition to land acquisition; Stop the road at Alleppey
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर रास्ता रोको Opposition to land acquisition; Stop the road at Alleppey 
मुख्य बातम्या

जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर रास्ता रोको

टीम अॅग्रोवन

आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा इशारा पुणे जिल्हा रेल्वे कृती समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ यांनी दिला. आळेफाटा येथे सोमवारी (ता.२) केलेल्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, खेड पंचायत समितीचे माजी सभापती पाटील बुवा गवारी, जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे, पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, प्रीतम काळे, विजय कुऱ्हाडे, नवनाथ निमसे, दिनेश सहाणे, उदय पाटील, संजय कुऱ्हाडे, शरद गाढवे, गणेश गुंजाळ, अनिल वाघोले सुंदर कुऱ्हाडे, मिननाथ शिंदे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. हायस्पीड रेल्वे जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली या तालुक्यातून जात असून अनेक शेतकऱ्यांच्या बागायती शेत जमिनींचे अधिग्रहण केले जात आहे. महारेलने मोजणीची प्रक्रिया कुठलीही माहिती न देता मोजणी सुरू केली आहे. या बाबत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला किती मिळणार, या बाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. तसेच या रेल्वे ज्या ठिकाणाहून जात आहे, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी जात आहेत. उर्वरित क्षेत्राला पाणीपुरवठा कुठून करायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइन आहेत, या बाबत महारेलने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अनेक प्रकल्पांना या पूर्वी आमच्या जमिनींचे संपादन झाले असल्याने रेल्वे प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT