नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच  Onion prices to the town The ups and downs continue
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच  Onion prices to the town The ups and downs continue 
मुख्य बातम्या

नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच 

टीम अॅग्रोवन

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात क्रमांक एकचा कांदा दोन हजार रुपयांनी विकला गेला. तोच कांदा आता शनिवारी एक हजार आठशे रुपयांनी विकला गेला. कांद्याची आवक कमी असली तरी दरातही पडझड सुरूच आहे.  नगर येथील बाजार समितीसह पारनेर, घोडेगाव, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले बाजार समितीतही कमीजास्त प्रमाणात कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने परराज्यांतील कांद्याची मागणी थंडावली आहे. तेथील लाल कांदा बाजारात आल्याने आपल्याकडील गावरान कांद्याचे भाव कमी झाले आहेत. साधारण दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर १९०० ते २ हजारांवर होते. मागील आठवड्यात हे दर कमी झाले. सोमवारी (ता. २०) ४२ हजार ९१४ कांदा गोण्याची आवक झाली आणि दरही १८०० रुपयांपर्यंत राहिले. कांद्याचे दर कमी होत आहेत. सतत पडझड सुरू राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उन्हाळ्यात काढलेला गावरान कांदा सध्या शेतकरी बाजारात विकीसाठी आणत आहेत. मात्र भाव नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची नाराजी आहे. या आठवड्यात पाऊस झाल्यास आपल्याकडील गावरान कांद्याचा उठाव होऊन दर वाढतील. सध्या अन्य राज्यांतही पावसाने उघडीप दिल्याने, त्यांचा लाल कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे आपल्याकडील गावरान कांद्याची मागणी घटून दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT