Onion price of Rs 13 thousand and 331 per quintal in Mangalvedha
Onion price of Rs 13 thousand and 331 per quintal in Mangalvedha 
मुख्य बातम्या

मंगळवेढा : कांद्याला १३ हजार ३३१ रुपये दर

टीम अॅग्रोवन

मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) झालेल्या कांद्याच्या लिलावात बबलू गायकवाड या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रतिक्विंटल १३ हजार ३३१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. सोलापूर बाजार समितीनंतर आता मंगळवेढ्यातही कांद्याच्या दरात तेजी आल्याचे चित्र आहे.

बुधवारी बाजारात १८० क्विंटल आवक झाली. मंगळवारी १९० क्विंटल आवक होती. मंगळवारी कांद्याला सरासरी ४८०० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये दर मिळाला. पण बुधवारी जवळपास दुप्पट दर मिळाला. शेतकरी बबलू गायकवाड यांच्या कांद्याला मारुती हरी काळे या व्यापाऱ्याने वसंत रामचंद्र चेळेकर यांच्या आडत दुकानातील लिलाव प्रक्रियेत बोली लावत १३ हजार ३३१ रुपये इतका उच्चांकी दर जाहीर केला. मंगळवेढ्यात पहिल्यांदाच कांद्याला एवढा उच्चांकी दर मिळाला. 

बाजार समितीत यापूर्वी वांग्याला व कांद्याला उच्चांकी दर मिळाला. याशिवाय तूर, मका आणि हरभरा आदींचे हमीभाव केंद्र सुरू करून त्या माध्यमातूनही जादाचा दर मिळाला. कांद्याला पहिल्यांदाच हा दर मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांनी शेतकरी गायकवाड या शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या आवारात सत्कार केला. 

या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे, मुंबईतील कांदा व्यापारी सुरेश मल्लाळे, कोल्हापूरचे गणेश थोरबोले, सचिव सचिन देशमुख, प्रमोद भगरे, नवनाथ बनसोडे, सचिन चेळेकर, अनिल बोदाडे, ओंकार भोसले,मारुती काळे, सत्यजीत सुरवसे, धनाजी पवार, दत्तात्रय कांबळे, परमेश्वर इंगळे, अरुण माने,दत्ता शिंदे, विनायक आवताडे, दत्तात्रय टुले,आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT