खानदेशातील कांदा काढणी हंगाम लांबला 
मुख्य बातम्या

खानदेशातील कांदा काढणी हंगाम लांबला

खानदेशात दरवर्षी खरिपातील कांद्याची काढणी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. परंतु यंदा अतिपाऊस, उशिराची लागवड यामुळे नवीन कांद्याला हंगाम महिनाभर लांबला आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात दरवर्षी खरिपातील कांद्याची काढणी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. परंतु यंदा अतिपाऊस, उशिराची लागवड यामुळे नवीन कांद्याला हंगाम महिनाभर लांबला आहे. डिसेंबरमध्ये नवा कांदा बाजारात येईल, अशी स्थिती आहे.  सध्या गेल्या उन्हाळ कांद्याची ज्यांनी साठवणूक केली, त्या  कांद्याची बाजारात अधिक आवक आहे. या कांद्याचे दर सध्या प्रतिक्विंटल ३००० रुपये, असे  आहेत. उन्हाळ कांद्याची मे, जूनमध्ये मातीमोल दरात शेतकऱ्यांना विक्री करावी लागली होती. या कांद्याचे दर सप्टेंबरपासून वधारू लागले. दर वधारल्यानंतर निर्यातबंदी व इतर निर्णय झाले. त्याचाही फटका बसला. पण दर स्थिर राहीले. सध्या उन्हाळ कांद्यातील फक्त १० टक्के कांद्याची साठवणूक शेतकऱ्यांकडे आहे. या कांद्याच्या विक्रीतून शेतकरी झालेला तोटा भरून काढू शकतात. परंतु दरवाढ रोखण्यासंबंधी सुरू असलेल्या उपायांबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  कांदा दरात सुधारणा नव्हती. तरीदेखील जूनमध्ये खरिपातील कांद्याची तयारी सुरू झाली. परंतु अतिजोरदार पाऊस, अतिपाऊस व इतर समस्यांमुळे खरिपातील कांदा रोपवाटिकांचे धुळ्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, धरणगाव, यावल भागात मोठे नुकसान झाले.  नव्याने कांदा रोपवाटिका तयार कराव्या लागल्या. यात पुढे पुनर्लागवडही उशिराने करावी लागली. अनेकांनी ही लागवड ऑक्टोबरच्या सुरवातीला केली. यामुळे कांदा काढणी हंगाम लांबला आहे. डिसेंबरअखेर काढणी सुरू होईल, अशी स्थिती सर्वत्र  आहे.

बाजारात आवक रोडावली बाजारात कांद्याची आवक रोडावली आहे. धुळे, जळगाव, चोपडा, चाळीसगाव येथील बाजार कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत. या बाजार समित्यांमध्ये मिळून सध्या प्रतिदिन दीड ते दोन हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या वर्षी जळगावच्या बाजारात नोव्हेंबरअखेर प्रतिदिन १२०० क्विंटल लाल कांद्याची आवक सुरू होती. यंदा ही आवक लांबली आहे. पुढे आवक वाढली तर दर कमीदेखील होवू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT