onion growers waiting for insurance money in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक पीकविम्याच्या प्रतीक्षेत

या संदर्भात आलेल्या अर्जाची माहिती घेण्याची सूचना मी संबंधित विभागाला दिली आहे. या प्रकरणावर लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल. - मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

टीम अॅग्रोवन

सोलापूर : कधी अस्मानी, तर कधी प्रशासकीय संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत २०१८ मध्ये कांदा पिकासाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे.

माढा तालुक्‍यातील अंजनगाव, भोसरे, अकोले, उपळवटे, चौभे पिंपरी या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली आहे. या तक्रारीवर सुनावणी केव्हा होणार? आणि न्याय केव्हा मिळणार याकडे, त्यांचे लक्ष लागले आहे.

या योजनेसाठी नियुक्त विमा कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पीक कापणीचे बोगस रेकॉर्ड तयार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबतच्या तक्रारीवर माढा तहसीलदार यांच्याकडे सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या बदली प्रक्रियेत शेतकऱ्यांचा हा विषय प्रशासनाच्या विस्मरणातून गेला की काय? अशी शंका शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. विम्यापासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी ॲड. धनंजय चव्हाण यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT