एलईडी बल्ब
एलईडी बल्ब 
मुख्य बातम्या

अबब! एका एलईडी बल्बची किंमत ४०९२ रुपये

टीम अॅग्रोवन

भंडारा ः चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एका बल्बची खरेदी ४०९२ रुपये दाखवित ८० बल्बच्या खरेदीतून ३ लाख २७ हजार ४२० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे. गुंथारा ग्रामपंचायतमध्ये घडलेल्या या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.  भंडारा  पंचायत समितीअंतर्गंत येणाऱ्या गुंथारा येथील सचिव वाय. एच. डोंगरवार, सरपंच शुभांगी सार्वे यांनी या प्रकारात अपहार केल्याचा आरोप आहे. उपसरपंच दिलीप कायते, सदस्य रमेश चावरे, साधू सार्वे, मंदाबाई कमाने, मंजूषा जगनाडे यांनी याप्रकरणी तक्रार केली. महाराष्ट्र पंचायत अधिनियमानुसार सरपंच, ग्रामसेवक यांना पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दोषी ठरवित पदमुक्‍त करण्याची मागणी करण्यात आली आहे.   एलईडी दिव्यांची खरेदी करताना मासिक सभेची परवानगी घेण्यात आली नाही, असाही आरोप सदस्यांचा आहे. कोटेशनही पदाधिकाऱ्यांना दाखविण्यात आले नाही. न्यू चेतन इलेक्‍ट्रॉनिक्‍स या व्यावसायिकाला २१ नोव्हेंबर २०१७ रोजी ८० एलईडी बल्बच्या खरेदीपोटी ३ लाख २७ हजार ४२० रुपये देण्यात आले. एका एलईडी बल्बची खरेदी ४०९२ रुपयांना करण्यात आली. खरेदी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे बल्ब खांबांवरदेखील लावण्यात आले. हा सारा प्रकार गोंधळात टाकणारा असून, याप्रकरणी सविस्तर चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT