cyclone
cyclone  
मुख्य बातम्या

एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले 

टीम अॅग्रोवन

मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग वाढत असून, रायगडसह किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणातील काही भागाला तडाखा बसला आहे.  ‘‘मुंबई-ठाण्याचा काही भाग चक्रीवादळाच्या पट्ट्यात आहे. वादळ दिशा बदलण्याची शक्यता कमी असून जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा तशी वेग १०० ते ११० किलोमीटर असल्याची,’’ माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. ‘‘वादळाची लँडफॉल हेण्यास सुरुवात झाली असून ही संपूर्ण प्रक्रिया तीन तासांची असेल. रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे वादळ सरकत जाईल. सध्या अलिबागमध्ये जोर असून १२५ किलोमीटर प्रतितास वारे वाहत असल्याचेही,’’ त्यांनी सांगितले आहे.  दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दुपारी १२.२० च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास १३० किलोमीटर अंतरावर पोहोचले होते. रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वाऱ्याने जोरदार वेग पकडला असून वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटरवर पोहोचला. चक्रीवादळाचा प्रभाव दोन दिवस महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.  मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT