One and a half hundred farmers in Jalalkheda are deprived of crop loans
One and a half hundred farmers in Jalalkheda are deprived of crop loans 
मुख्य बातम्या

जलालखेडा येथील दीडशे शेतकरी पीककर्जापासून वंचित

टीम अॅग्रोवन

नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतरही भारतीय स्टेट बँकेच्या जलालखेडा शाखेकडून गेल्या दोन महिन्यांपासून दीडशे शेतकऱ्यांना कर्जासाठी ताटकळत ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत पीक कर्जासाठी ४८९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील ३३९ शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात आले. उर्वरित दिवशी शेतकऱ्यांना मात्र बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांनी दोन ते अडीच महिन्यांत पूर्वीचा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र, त्यानंतरही वेळेवर कर्ज उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या लागवडीसाठी उसनवारी करावी लागली. त्यानंतर कर्ज मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी शेतीची कामे सोडून रोज बँकेत हजेरी लावत आहेत. परंतु बँक कर्मचाऱ्यांकडून पीक कर्ज तर दूरच साधी सौजन्याची वागणूक देखील मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. ‘‘तुम्हाला बोलावले का, अजून वेळ लागेल, बँकेतून फोन आला का’’, अशी उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती आहे. त्यांच्याकडून देखील या संबंधाने हस्तक्षेप नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

साडेतीन कोटींचे पीककर्ज भारतीय स्टेट बँकेच्या जलालखेडा शाखेला ४८९ पीककर्ज अर्ज प्राप्त झाले होते. यातील ३३९ शेतकऱ्यांना तीन कोटी ३१ लाख ४१ हजार ३०० रुपयांची कर्ज वितरित करण्यात आले, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT