Oilseed crops will be more in the near future: Dr. Devasarkar
Oilseed crops will be more in the near future: Dr. Devasarkar 
मुख्य बातम्या

येत्या काळात तेलबिया पिके जास्त दिसतील : डॉ. देवसरकर

टीम अॅग्रोवन

लातूर : ‘‘तेलबिया पिकाची खूप आवश्यकता आहे. त्यातील बियाणे उपलब्धतेबाबत समस्या असतील, त्या आपण दूर करू शकलो, तर येत्या काळात सूर्यफूल, करडई, जवस ही पिके नक्कीच जास्त क्षेत्रावर दिसतील,’’ असा विश्‍वास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर यांनी व्यक्त केला.

कृषी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले आणि डॉ. देवसरकर यांनी एकत्रितपणे नुकतीच तेलबिया संशोधन केंद्र लातूर येथे भेट दिली. विविध तेलबिया पिकाच्या प्रयोगाची पाहणी  केली. 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘आपला देश तेलाबाबत फार इतरांवर अवलंबून आहे. अन्नधान्याची गरज भागवून निर्यात देखील करतो. परंतु तेलबियाबाबत येथून पुढील काळात खूप काम करण्याची गरज आहे. मराठवाड्याच्या शेतीसाठी या तेलबिया संशोधन केंद्राचे मोठे महत्त्व आहे. येथून नुकताच प्रसारित झालेला जवस पिकाचा ‘लातूर ९३’  हा वाण शेतात दिसत आहे. त्याच बरोबर येत्या काळात हे केंद्र सूर्यफूल पीक वाणासाठीही ओळखले जाईल. या पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी उत्स्फूर्तपणे पुढे येत नाहीत. याची नेमकी काय कारणे असू शकतात, या कडेही केंद्राने लक्ष द्यावे.’’ 

डॉ. गोखले म्हणाले, ‘‘पिकाचे शास्त्र अगोदर माहीत हवे. त्यासाठी जमीन, हंगाम, सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, हेक्टरी बियाणे, अंतर, पेरणीसोबत खते, आंतरमशागत, कीड व रोग व्यवस्थापन, महत्त्वाच्या पीक संवेदनशील अवस्थेत पाणी व्यवस्थापन करणे या बाबी महत्त्वाच्या असतात. आता बदलते हवामान मोठी समस्या आहे. परंतु सर्वांसोबत काम करून या साठीचे लागणारे संशोधन नक्कीच येत्या काही वर्षांत शास्रज्ञाच्या हाताला लागेल याची खात्री आहे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT