The number of paddy procurement centers in Bhandara district will increase this year
The number of paddy procurement centers in Bhandara district will increase this year 
मुख्य बातम्या

भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांच्या संख्येत यंदा होणार वाढ

टीम अॅग्रोवन

भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात हंगामातील धान खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.  खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

धानाचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी धानाला १८१५ रुपये हमीभाव तसेच ७०० रुपये बोनस स्वरूपात अतिरिक्‍त देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे.

गेल्या हंगामात देखील धानाला बोनस जाहीर करण्यात आला होता. परंतु, त्यावेळी केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. ही बाब लक्षात घेता यावेळी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विभागाने सर्व बाबींचे नियोजन त्या पार्श्‍वभूमीवर करावे. धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्ध करावा, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्‍ता तनपुरे, आमदार राजू कारेमोरे, मोहन चंद्रिकापुरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.

या मुद्यांवर चर्चा

  •   दीड ते दोन हजार हेक्‍टरमागे एक केंद्र
  •   बाजार समित्यांना खरेदीची परवानगी
  •   बारदाना नियोजन खरेदीपूर्वीच व्हावे
  •   धानाच्या साठवणुकीसाठी गोदामाची       सुविधा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT