संत्रा छाटणी यंत्र
संत्रा छाटणी यंत्र  
मुख्य बातम्या

संत्रा छाटणीकरिता आता विदेशी सयंत्राचा पर्याय

टीम अॅग्रोवन

नागपूर ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयासह विदर्भातील तीन केंद्रांना संत्रा छाटणी सयंत्राकरिता निधी मंजूर झाला आहे. यातील इटली बनावटीचे पहिले सयंत्र नागपूर कृषी महाविद्यालयात दाखल झाले असून, अमरावती आणि अचलपूर येथील केंद्राकरिता लवकरच उर्वरित दोन सयंत्राशी उपलब्धता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  संत्रा झाडांच्या छाटणीमुळे समान आकाराची फळधारणा होते. त्यासोबतच फळांचा दर्जा सुधारतो, ए ग्रेडची फळे अधिक मिळण्यास मदत होते. फळांचा दर्जा सुधारल्याने अशा फळांना दोन ते अडीच पटीने अधिक दर मिळतो त्यासोबतच उत्पादनातही वाढ होते, असे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितले. छाटणीमुळे मधल्या भागातील फांद्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत हीच बाब झाडांच्या आणि फळांच्या पोषक वाढीस पूरक ठरते, असे निरीक्षण आहे. नवीन पालवीचे महत्त्व संत्रा उत्पादनात अधिक राहते. झाडाला नवीन पालवी फुटण्याचे प्रमाणही यामुळे वाढत असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.  छाटणी न केल्यास शेंड्याकडे फळे लागतात. त्याचा दर्जाही योग्य राहत नाही. त्यासोबतच झाडाला बांबूचा आधार द्यावा लागतो. काही शेतकरी मजुरांमार्फत हे काम करीत होते. परंतु एका दिवसात एका मजुराला केवळ दोन झाडांची छाटणीच शक्‍य होत होती. परिणामी, हे खर्चीक ठरत असल्याने अनेकांचा छाटणी टाळण्याकडेच अधिक भर होता. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संस्थेकडे सध्या एक सयंत्र आहे. परंतु त्याला मागणी अधिक आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाने तीन सयंत्रांचा प्रस्ताव राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून दिला होता. अभियानातून प्रत्येक सयंत्रांकरिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.  या काळात करावी छाटणी ऑक्‍टोबरमध्ये आंबिया बहरातील फळे निघाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये छाटणी फायद्याची ठरते. मृगाची फळे एप्रिलमध्ये तोडणी होतात त्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक तीव्र असल्याने त्या वेळी छाटणी करू नये, अशी शिफारस विद्यापीठाने केली आहे. मृगाकरिता जूनच्या पहिल्या आठवड्यात छाटणी फायद्याची ठरते, असे नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT