आता जुमलेबाजी चालणार नाही ः पृथ्वीराज चव्हाण
आता जुमलेबाजी चालणार नाही ः पृथ्वीराज चव्हाण 
मुख्य बातम्या

आता जुमलेबाजी चालणार नाही ः पृथ्वीराज चव्हाण

टीम अॅग्रोवन

नागपूर : ‘मोदी सरकारने दररोज नवनवे जुमले आणले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत देशात परिवर्तन आलेले दिसेल. चौकशीनंतर राफेलप्रकरणी अंतिम सत्य बाहेर येईल,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपुरात केले.

दीक्षाभूमी येथून प्रदेश काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला सुरवात झाली. या जनसंघर्ष यात्रेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे महासचिव व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रचे सहप्रभारी आशिष दुआ, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आदी उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. विकासाचे मुद्दे नसल्यामुळे आता रोज नवीन जुमले बाहेर काढून मतदारांना आकर्षित करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचा फायदा आता होणार नाही. जनतेला जुमलेबाजी करणारे सरकार असल्याचे लक्षात आले आहे. एकीकडे कृषी अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. या गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही.’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT