Notice to private companies for not growing soybeans
Notice to private companies for not growing soybeans 
मुख्य बातम्या

सोयाबीन न उगवल्याप्रकरणी खासगी कंपन्यांना नोटिसा

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या शेकडो तक्रारी प्रत्येक जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांची उगवण झाली नसल्याने शेतकरी दुबार पेरणीला सामोरा जात आहे. ‘महाबीज’ला पडताळणी करून बियाणे बदलून देण्याचे निर्देश शासनाने दिले असून, खासगी कंपन्यांना जिल्हा प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मध्य प्रदेशातील एका बियाणे कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून अकोल्यातही प्रशासनाने बियाणे न उगवलेल्या व शेतकऱ्यांना बियाणे न देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली. आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्यांना सुरुवात झाली. प्रामुख्याने १२ जूननंतर पावसाने खंड घेतल्याने या काळातील पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याची बाब प्रामुख्याने पुढे आलेली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे साडेपाचशे हेक्टरवरील बियाणे उगवलेले नाही; तर अकोल्यातही हा प्रकार तीनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राबाबत घडलेला आहे. अकोला जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक खासगी कंपन्यांनी सोयाबीन बियाण्यांची विक्री केली आहे. यापैकी काही कंपन्यांना नोटीस बजावली जात आहे. बुलडाण्यातही अशीच मोठी संख्या आहे; परंतु तेथे एका कंपनीविरुद्ध सध्या नोटीस देण्यात आली.

कृषी खात्याच्या चमूने थेट शेतांमध्ये जाऊन पडताळणी सुरू केली. यात महाबीजचा प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. महाबीजने सोयाबीन बियाण्यांची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याची तयारी केली आहे. खासगी कंपन्या काही ठिकाणी शेतकऱ्यांसोबत तडजोड करीत प्रकरणे मिटवत आहे; परंतु काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे न उगवण्याबाबत कंपन्यांकडून नकारात्मक भूमिका घेतली जात आहे. यामुळे शेतकरी व बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये खटके उडत आहेत. शेतकरी कंपन्यांविरुद्ध आंदोलने करू लागली आहेत. चिखली (जि. बुलडाणा) येथे शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

नुकसान अधिक; भरपाई कमी सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांचा खत, पेरणी, मजुरीवरील खर्च वाया जात आहे. आता दुबार पेरणासाठी शेतकऱ्यांना कंपनीने बियाणे दिले तरी यात शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होत आहे. पुन्हा दुबार पेरणी, खत, मजुरीचा खर्च करावा लागणार आहे. सोबतच पहिल्या व दुसऱ्या पेरणीत काही दिवसांचा कालावधीसुद्धा जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT