Notice to 651 farmers paying income tax 
मुख्य बातम्या

आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसा

आयकर भरत असूनही केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील ६५१ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने घेतलेले अनुदान परत करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ६ कोटी १५ लाख आठ हजार अनुदान घेतल्याचे समजते.

टीम अॅग्रोवन

शहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील ६५१ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने घेतलेले अनुदान परत करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ६ कोटी १५ लाख आठ हजार अनुदान घेतल्याचे समजते.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. योजनेच्या निकषाप्रमाणे आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेस पात्र नाहीत. केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी येथील तहसील प्रशासनास प्राप्त झाली आहे. या यादीत नाव असलेली शेतकरी योजनेत पात्र नाहीत. शेतकऱ्यांनी घेतलेल्या रकमा परत करण्याविषयी गावोगावच्या तलाठ्यांना अपात्र शेतकऱ्यांची यादी देण्यात आली आहे. तलाठ्यांकडून अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात येत आहे. धनादेशाद्वारे तहसील कार्यालयात या रकमा जमा कराव्यात, अशी सूचना मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही ज्या लाभार्थ्यांना मानधन दिले, त्यांची नावे तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहेत. तलाठ्यांमार्फत या रक्कमेची वसुली सुरू आहे. संबंधितांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. अपात्र लाभार्थ्यांनी रक्कमेचा परतावा करावा. अन्यथा प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. - डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा, जि. नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT