Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

कोकणात हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. आज (ता.२) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहार परिसरावर आहे. मध्य उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाना आणि परिसरावर असून ते निवळले जाणार आहे. नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून  या दोन्ही कमी दाब क्षेत्रांमधून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. 

उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.३) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या सरींसह पावसाची उघडीप  राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  येथे होणार जोरदार पाऊस  सोमवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  मंगळवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक  बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक  गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, संपूर्ण राज्यात तुरळक  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २८.१ (०.५) 
  • जळगाव - ३१.५ (-०.१) 
  • कोल्हापूर - २५.८ (-०.६) 
  • महाबळेश्वर - १९.४ (-०.१) 
  • मालेगाव - ३०.८ (१.१) 
  • नाशिक - २७.३ (-०.५) 
  • सांगली - २७.४ (-१.०) 
  • सातारा - २६.० ( -०.४) 
  • सोलापूर - ३०.२ (-१.०) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.८ (१.०) 
  • अलिबाग - ३०.६ (०.९) 
  • रत्नागिरी - २९.१ (०.६) 
  • डहाणू - ३०.७ (०.६) 
  • औरंगाबाद - २९.१ (-०.१) 
  • परभणी - ३०.४ (-०.३) 
  • नांदेड- ३३.० (१.७) 
  • अकोला - ३०.० (-०.९), 
  • अमरावती - २८.४ (-१.८) 
  • बुलडाणा - २७.८ (-०.३) 
  • ब्रम्हपुरी - २८.९ (-१.८) 
  • चंद्रपूर - ३१.४ (०.८) 
  • गोंदिया - २८.४ (-२.६) 
  • नागपूर - २९.५ (-१.३) 
  • वर्धा - २९.० (-१.७)   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

    Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

    Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

    Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

    SCROLL FOR NEXT