संयम, समंजसपणा आणि योग्य दक्षता हवी : शरद पवार
संयम, समंजसपणा आणि योग्य दक्षता हवी : शरद पवार 
मुख्य बातम्या

संयम, समंजसपणा आणि योग्य दक्षता हवी : शरद पवार

टीम अॅग्रोवन

मुंबई : कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत; परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे याची गांभीर्याने दक्षता घ्याल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला सोमवारी (ता. २३) केले.

‘कोरोना’चा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहे, या बाबत श्री. पवार यांनी चिंता व्यक्त केली.

इतर देशात गंभीर स्थिती आहे. त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन नागरिकांनी दक्षता घेतली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपणही गांभीर्याने घ्यायची गरज आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर घराबाहेर पडू नका. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावे, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT