नांदेड, परभणी, हिंगोलीत लांबणीवर पडलेली पेरणी सुरू
नांदेड, परभणी, हिंगोलीत लांबणीवर पडलेली पेरणी सुरू 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत लांबणीवर पडलेली पेरणी सुरू

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता. २४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १०४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सरसम (ता. हिमायतनगर) मंडळात (६९ मिमी) अतिवृष्टी झाली. पावसाच्या खंडामुळे लांबणीवर पडलेली पेरणी चांगल्या पावसामुळे सुरू झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी सकाळी आठपर्यंत नांदेड, मुदखेड, हिमायतनगर, हदगाव, भोकर, उमरी, बिलोली, नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यांतील ५३ मंडलामध्ये पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ३४ मंडलामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला; परंतु अनेक भागात पावसाचा जोर कमी होता. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुके वगळता अन्य तालुक्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्व पाच तालुक्यांतील १७ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ७, नांदेड ग्रामीण ५,  वसरणी १५, तुप्पा १२, विष्णुपुरी ७, मुदखेड १९, मुगट ११, बारड ५४, हिमायतनगर १८, सरसरम ६९, जवळगाव १२, पिंपरखेड ६०, निवघा ३२, तळणी ५, भोकर २५, मोघाळी २०, किन्ही ३६, उमरी ११, सिंधी १६, गोलेगाव १०, कुंडलवाडी ५, नायगाव ५, मांजरम ७, बरबडा ६, कुंटूर ६, देगलूर १०, मरखेल ३४, मालेगाव १२, जांब १८ , माळकोळी ११, शेवडी १०, सोनखेड ३६. परभणी जिल्हा ः सिंगणापूर १०, झरी ७, पेडगांव ५, जिंतूर ६, सावंगी म्हा.८, बामणी ११,कोल्हा ३७, गंगाखेड २२, राणीसावरगाव ६, माखणी १६, महातपुरी १७, पालम ५, चाटोरी २४, पूर्णा ७, ताडकळस ६.

हिंगोली जिल्हा ःहिंगोली १७, माळहिवरा ८, डिग्रस १७, नांदापूर ११, आखाडा बाळापूर ५७, वारंगा ७, सेनगाव ९, गोरेगाव १४, आजेगाव २८, औंढा नागनाथ ५०, येळेगाव ५, साळणा ८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT