In Nanded district, the distribution of relief aid is not even after two months
In Nanded district, the distribution of relief aid is not even after two months 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे वाटप दोन महिन्यानंतरही नाहीच

टीम अॅग्रोवन

नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडून ७५ टक्क्यांनुसार प्राप्त ४५५ कोटींची मदत जिल्हा बँकेमार्फत वाटपाचे नियोजन आहे. परंतु शंभर टक्के जमाखर्च झाल्याशिवाय बँकेमार्फत मदतीच्या वाटपाचे काम सुरु होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यात मार्च ते सप्टेंबर या कालवधीत अतिवृष्टीमुळे सहा लाख सहा हजार ४६४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका आठ लाख ६१ हजार ९१८ शेतकऱ्यांना बसला. याबाबत नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी शासनाकडून ६१२ कोटींचा निधी अपेक्षित आहे. यापैकी पहिला हप्ता म्हणून जिल्ह्याला ७५ टक्क्यांनुसार ४५५ कोटी ७२ लाखांचा निधी प्राप्त झाला. हा निधी प्रशासनाने तीन नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्यांना वितरित केला आहे. या निधी वाटपाचे नियोजन पुन्हा एकदा जिल्हा बँकेकडून केले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यांत दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याच्या वल्गना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा भंडाफोड झाला आहे. जिल्हा बँकेकडे निधी वाटपाचे नियोजन होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला. परंतु अद्याप मदत जमा झाली नाही. आतापर्यंत जमाखर्चाचे काम ७० टक्के झाले आहे. ज्या बँकेत जमाखर्च झाले आहे, अशा शेतकऱ्यांना एटीएममार्फत मदत वाटप झाली. उर्वरित जमाखर्चाचे काम झाल्यानंतर बँकेमार्फत वाटप ‘ए टू झेड’ या इंग्रजी अद्याक्षरानुसार गावनिहाय सुरु होणार आहे, अशी माहिती बँक प्रशासनाकडून मिळाली. 

जिल्हा बँकेकडून जिल्ह्यात सोळा ठिकाणी एटीएम मशिन बसविणार आहेत. त्या २६ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होतील. बँकेमार्फत आजपर्यंत दीड लाख एटीएम कार्ड वाटप करण्यात आले आहेत. तर एक लाख कार्ड वाटपाचे नियोजन आहे, अशी माहिती मिळाली.

शंभर टक्के जमाखर्च झाल्यानंतरच बँकेमार्फत मदत वाटपाचे काम सुरु होईल. बँकेकडून संगणक हाताळणारे ५० सेवानिवृत्त कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. यासोबतच रिक्त ३३७ कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी रीतसर कार्यवाही सुरु आहे.

- अजय कदम, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT