खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी पाणी
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी पाणी  
मुख्य बातम्या

खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी पाणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील साक्री, शिरपुरातील आदिवासी भाग, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, भडगाव, चोपड्यातील आदिवासी भागात जलसाठे बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे टंचाई कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत टंचाई अल्प प्रमाणात असल्याने प्रशासनाची डोकेदुखीदेखील कमी झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, जळगाव, चाळीसगाव, चोपडा तालुक्‍यातील आदिवासी भागात टंचाई असते. यंदा, मात्र टंचाई आराखडा निम्म्या खर्चाचा तयार झाला होता. सुमारे २१ कोटींची तरतूद केली होती. सध्या जिल्ह्यात सुमारे सात टॅंकर सुरू आहेत. 

साक्री तालुक्‍यात यंदा भीषण पाणीटंचाईची स्थिती उद्‌भवलेली नाही. ज्या ग्रामपंचायतींकडून याबाबत प्रस्ताव आले आहेत, अशा दोन ठिकाणी सध्या टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. १४ गावांमध्ये विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. 

तालुक्‍यातील मध्यम प्रकल्पांमध्येही समाधानकारक जलसाठा आहे. अशातच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०१९-२० साठी ऑक्‍टोबर २०१९ पासूनच कृती आराखडा तयार करत नियोजन केले होते. एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी १५ गावे व २१ वाड्यांसाठी सुमारे ३६ विविध उपाययोजनांचे नियोजन केले होते. 

चोरवड पैकी धसकलपाडा, बोपखेल पैकी भिलखडी, देवजीपाडा, तसेच देवजीपाडापैकी तोरसपाडा, लगडवाड पैकी नवागाव, कालटेक, कालटेक पैकी पचाळे, वाकी पैकी चाफाबंद, कोर्डे, शेंदवड पैकी केवडीपाडा व मावजीपाडा, पापडसोंडा पैकी भुरीविहीर, आमखेल व प्रतापपूर आदी १४ ठिकाणी विहीर अधिग्रहण केल्या. पेरेजपूर पैकी सालटेक, डोमकाणी पैकी मळगाव व दिवाणेमाळ या दोन ठिकाणी सध्या टॅंकर सुरू आहेत.  शिरपुरात सात पाड्यांत उपाययोजना 

शिरपूर तालुक्‍यातील सहा पाडे व एका गावात उपाययोजना केल्या आहेत. डिसेंबरमध्ये पंचायत समितीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला होता. चार ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या सहा पाड्यांसह एका गावात पाणीटंचाई जाणवू शकेल, असे निश्‍चित करण्यात आले. 

टेंभेपाडा ग्रामपंचायतीअंतर्गत नवापाडा, बुडकीविहीर व चोंदीपाडा येथे पाणीटंचाईची शक्‍यता आहे. तेथे विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. चांदपुरी गावातही पाणीटंचाईची शक्‍यता लक्षात घेऊन विहीर अधिग्रहित केली आहे. दुर्गम भागातील गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतींतर्गत थुवानपाणी व प्रधानदेवी येथे, तसेच वरझडी ग्रामपंचायतींतर्गत अंबरपाडा येथे विशेष उपाययोजना केल्या आहेत.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT