MSEDCL interacts with customers through WhatsApp 
मुख्य बातम्या

महावितरण साधणार ग्राहकांशी व्हॉट्‌सॲपद्वारे संवाद

पुणे प्रादेशिक विभागात पहिल्या टप्प्यात व्हॉट्‌सॲपचे सुमारे सात हजार ३५० ग्रुप तयार करण्यात येत आहेत. त्याद्वारे सुमारे १८ लाख ३७ हजार वीज ग्राहकांशी नियमित संवाद साधणार आहेत, अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली आहे.

टीम अॅग्रोवन

सातारा : ग्राहक संवादासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणकडून जिल्ह्यातील सुमारे ८७५ ग्रुपद्वारे सुमारे दोन लाख १८ हजार वीज ग्राहकांचा समावेश करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागात पहिल्या टप्प्यात व्हॉट्‌सॲपचे सुमारे सात हजार ३५० ग्रुप तयार करण्यात येत आहेत. त्याद्वारे सुमारे १८ लाख ३७ हजार वीज ग्राहकांशी नियमित संवाद साधणार आहेत, अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली आहे.

पुणे प्रादेशिक विभागातील महत्त्वाच्या व मोठ्या वीजग्राहकांसाठी प्रादेशिक विभाग स्तरावर प्रादेशिक संचालक, परिमंडल स्तरावर मुख्य अभियंत्यांकडून व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता ते शाखा अभियंते हे सर्व कार्यालयप्रमुख तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनमित्रापर्यंत प्रत्येकी एक ग्रुप तयार करण्यात येईल. सातारा जिल्ह्यात एका मंडल कार्यालयासह पाच विभाग, २४ उपविभाग आणि १३० शाखा कार्यालये आहेत. त्यासोबतच प्रत्येक जनमित्रापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत.

सुमारे ८७५ ग्रुपच्या माध्यमातून दोन लाख १८ हजार वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात येईल. या व्हॉट्‌सॲप ग्रुपमधील वीज ग्राहकांमध्ये उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील ग्राहक, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी, वाणिज्यिक संकुल पदाधिकारी, महत्त्वाचे ग्राहक, लघुउद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक वसाहत संघटना पदाधिकारी, एमआयडीसी वाहिन्यांवरील ग्राहकांचा समावेश राहील.

ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबतच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, वाड्या-वस्त्यांमधील काही ग्राहकांचाही समावेश असेल. या ग्रुपद्वारे विविध वीजपुरवठा बंद असल्याचे कारण व सुरू होण्याचा संभाव्य कालावधी तसेच महावितरणच्या विविध ग्राहक सेवांची व वीज सुरक्षेबाबतची नियमितपणे माहिती दिली जाणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून प्राप्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती तसेच इतर विविध तक्रारींचे तत्परतेने निवारण करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT