पुणे ः शेतकऱ्यांनी नाबार्डच्या कार्यालयावर साेमवारी (ता. २२) माेर्चा काढला. या वेळी मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील.
पुणे ः शेतकऱ्यांनी नाबार्डच्या कार्यालयावर साेमवारी (ता. २२) माेर्चा काढला. या वेळी मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील. 
मुख्य बातम्या

कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्या

टीम अॅग्रोवन

पुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने काेल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावरून परस्पर काढून घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मान्य करणार नाही, असे लेखी द्या किंवा कर्जमाफीची रक्कम पुन्हा खात्यावर जमा करा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने साेमवारी (ता. २२) नाबार्डच्या कार्यालयावर माेर्चा काढण्यात आला.

जाेपर्यंत नाबार्ड आदेश न मानण्याचे लेखी देत नाही किंवा बॅंक खात्यावर पैसे जमा करत नाही, ताेपर्यंत आंदाेलन मागे घेणार नाही, असा इशारा संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.   

या वेळी बाेलताना पाटील म्हणाले, ‘‘२००८ च्या कर्जमाफीबाबत खासदार राजू शेट्टी आणि दिवंगत सदाशिव मंडलिक यांनी केलेल्या तक्रारीनंतर काेल्हापूर जिल्ह्यातील ४४ हजार ६०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची जमा झालेली सुमारे ११२ काेटी रुपये रक्कम नाबार्डने परस्पर काढून घेतली. याची तक्रार नाबार्डकडे केल्यानंतर नाबार्डने उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने कर्जमाफीची रक्कम पुन्हा बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश ३० जानेवारी २०१७ राेजी दिले; मात्र तरीही नाबार्डने अद्याप रक्कम जमा केलेली नाही.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश मान्य करणार नाही, असे लेखी द्या किंवा कर्ज माफीची रक्कम पुन्हा खात्यावर जमा करा, अशी आमची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT