मराठवाड्यात २ कोटी टन उसाचे गाळप 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात २ कोटी टन उसाचे गाळप

मराठवाड्यात यंदाच्या गाळप हंगामात ५५ कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी ३० मार्च अखेरपर्यंत २ कोटी ६ लाख ९ हजार ४०१ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले आहे .

Santosh Munde

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या गाळप हंगामात ५५ कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी ३० मार्च अखेरपर्यंत २ कोटी ६ लाख ९ हजार ४०१ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम गत काही वर्षांतील बंपर हंगाम मानला जात आहे .  यंदाच्या गाळपाच्या हंगामात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ५५ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदविला. त्यामध्ये २४ सहकारी व ३१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. ३० मार्च अखेरपर्यंतच्या गाळप अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील २ सहकारी व ४ खासगी मिळून, ६ कारखान्यांनी २१ लाख ५६ हजार ३८ टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.८१ टक्‍के उताऱ्याने २१ क्‍विंटल १४ लाख ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील ३ सहकारी व २ खासगी कारखाने मिळून ५ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप केले. या कारखान्यांनी २१ लाख ४७ हजार ७४९ टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.९३ टक्‍के उताऱ्याने २१ लाख ३२ हजार २६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.  बीड जिल्ह्यातील ५ सहकारी व २ खासगी मिळून ७ कारखान्यांनी ३२ लाख ८४ हजार ९७ टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.१२ टक्‍के उताऱ्याने २९ लाख ९४ हजार ८० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ सहकारी व ८ खासगी मिळून १२ कारखान्यांनी ४० लाख ३१ हजार २५८ टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.३६ टक्‍के उताऱ्याने ३७ लाख ७३ हजार ७५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी व ४ खासगी कारखाने मिळून ८ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदवीला. या कारखान्यांनी ३० लाख ४४ हजार २७० टन उसाचे गाळप करत, ९.८५ टक्‍के उताऱ्याने २९ लाख ९८ हजार ३९० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील ६ खासगी कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी २६ लाख १० हजार ५९२ टन उसाचे गाळप करत, सरासरी १०.२५ टक्‍के उताऱ्याने २६ लाख ७४ हजार ६३० क्‍विंटल साखर उत्पादित केली. हिंगोली जिल्ह्यातील ४ सहकारी व १ खासगी मिळून ५ कारखान्यांनी १४ लाख ५४ हजार ९५ टन उसाचे गाळप करत, सरासरी १०.२१ टक्‍के उताऱ्याने १४ लाख ८४ हजार १८० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. नांदेड जिल्ह्यातील २ सहकारी व ४ खासगी कारखाने मिळून ६ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी १८ लाख ८१ हजार ३०२ टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.६३ टक्‍के उताऱ्याने १८ लाख १२ हजार ७५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी  दिली. यंदा साखरेचे उत्पादन बंपर असले, तरी साखरेला उठाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT